फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. कल्याण काळे यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार डॉ. काळे यांचे बंधू जगन्नाथ काळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने खासदारांच्या डोक्याला ताप झाला आहे. विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी जगन्नाथ काळे यांनी दाखल केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.