फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी निवडणुकीचा अचूक खर्च सादर करावा. यात कुठलीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. उमेदवाराच्या खर्चाची तपासणी ९, ११ आणि १८ नोव्हेंबर या तीन दिवसांत केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी योग्य माहिती द्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी केले आहे. यासंदर्भात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीच्या बैठकीच्या आयोजन मंगळवारी (ता. पाच) करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.