मुंबई : पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना सर्वतोपरीने मदत करतानाच बंडखोरांना काबूत आणण्यासाठी राजकीय पक्षांनी युद्धस्तरावर मोहीम उभारली आहे. विदर्भातील आठ, मराठवाड्यातील सहा, पश्चिम महाराष्ट्रातील चार, उत्तर महाराष्ट्रातील तीन, मुंबईतील दोन आणि कोकणातील एका जागेवरील बंडखोर हा सध्या सर्वपक्षीय चिंतेचा विषय झाला आहे. या मतदारसंघांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात येत असली तरी राजकीय पक्ष याबाबत परस्परांचा अंदाज घेण्यात गुंतले आहेत.