परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांत यंदा अत्यंत चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांना तगडे आव्हान दिले जात आहे. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार; तसेच अपक्ष उमेदवार सक्रिय प्रचारात उतरले असून, प्रचाराच्या धामधुमीत मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. वेगवेगळी राजकीय समीकरणे, स्थानिक मुद्दे आणि प्रचारातील नव्या युक्त्या दिसत आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात कोणता उमेदवार कसा प्रतिसाद मिळवितो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.