Yavatmal assembly election 2024 : यवतमाळ जिल्ह्यातील सात मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान,राजकीय पक्षांचे वाढले टेन्शन

Yavatmal Vidhan Sabha election 2024 : यवतमाळच्या सात विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवारांनी महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने राजकीय पक्षांचे टेन्शन वाढले आहे.
Yavatmal Assembly Election
Yavatmal Assembly Election 2024 sakal
Updated on

यवतमाळ : जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांनी अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली आहे. पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोर मैदानात उतरल्याने राजकीय पक्षाचे टेन्शन वाढले आहे. बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला असला तरी बंड थंड होणार का, हे चार नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.