मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि शिवसेना नेते प्रदीप शर्मा हे पक्षाचा आदेश डावलून बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पत्नी स्विकृती शर्मा यांचा उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या अंधेरीतील २५, ००० जनतेसह शक्तीप्रदर्शन करत आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली आहे.