Prakash Ambedkar : निवडणुकीत आरक्षणाचा विषय प्रभावी ठरणार,वर्गीकरण, क्रिमिलेअर खुल्या वर्गासाठी का लागू नाही? : प्रकाश आंबेडकर
Nagpur Vidhan Sabha Election 2024 : प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती उपवर्गीकरण व क्रिमिलेअर शिफारस खुल्या वर्गासाठी का नाही, असा सवाल उपस्थित केला. आरक्षणावरून मागास जाती-जमातींमध्ये सामाजिक तेढ निर्माण झाल्याचा आरोप केला.
नागपूर : ओबीसी आरक्षणावरून ओबीसी विरुद्ध मराठा आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उपवर्गीकरण व क्रिमिलेअर विषयावरून मागास जाती-जमातीमध्ये तेढ निर्माण झाली आहे. हे एकप्रकारचे सामाजिक विघटन आहे.