Beed Assembly Election 2024 : तर उमेदवार मीच असायला हवे , आमदार प्रकाश सोळंकेंनीच मागितली पक्षाकडे उमेदवारी

Beed Vidhan Sabha Election2024 : मागच्या विधानसभा निवडणुक प्रचारात शेवटची निवडणूक म्हणणाऱ्या व महिनाभरापूर्वीच राजकीय निवृत्ती जाहीर करणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली.
Beed Assembly Elections 2024
Beed Assembly Elections 2024sakal
Updated on

बीड : मागच्या विधानसभा निवडणुक प्रचारात शेवटची निवडणूक म्हणणाऱ्या व महिनाभरापूर्वीच राजकीय निवृत्ती जाहीर करणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. पुतणे जयसिंग सोळंके यांना राजकीय वारसदार जाहीर केल्यानंतर स्वत:च उमेदवार कसे, असे तर्कवितर्क सुरु असताना याचा खुलासा झाला आहे. रमेश आडसकर यांना टक्कर द्यायची असेल तर आपणच उमेदवार असायला हवे, असे खुद्द प्रकाश सोळंके यांनी सांगीतल्यानेच त्यांना उमेदवारी जाहीर केल्याचे एका कथित ऑडीओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार समोरच्या व्यक्तीला सांगत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.