PM Modi Dhule Speech: धुळ्यात पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या युती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस पुन्हा काश्मीरमध्ये षडयंत्र रचत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेसला काश्मीर तोडायचे आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० परत हवे आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत जे काही घडले ते तुम्ही पाहिले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र या भाषणात एक वेगळी गोष्ट दिसून आली आहे.