पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती संभाजीनगरनंतर खारघरमध्ये सभा घेतली आहे. या सभेत त्यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. तसेच मविआवरही निशाणा साधला आहे. त्यांनी मराठी भाषेत भाषणाला सुरूवात करत रायगडवासीयांना नमस्कार केला. .नरेंद्र मोदी म्हणाले की, मी शिव पवित्रा भूमीला नमन करतो. रायगडवासीयांना माझा नमस्कार...रायगड सोबत माझे भावात्मक संबंध आहेत. 2013 मध्ये माझं नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर झालं तेव्हा मी रायगड किल्ल्यावर गेलो. जसा भक्त देवाच्या समोर बसतो तसा मी बसलो. 31 ऑक्टोबर मध्ये गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन करायला गेलो. तिथे परेडमध्ये रायगडच्या किल्ल्याची प्रतिकृती होती, असं ते रायगडबाबत म्हटलं आहेत. .आजची गर्दी बघून 23 तारीखला निकाल काय येणार याची गॅरंटी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महायुती आहे, तरच गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे असा आवाज येतो. लोकनेते दि बा पाटील यांना अभिवादन करतो. त्यांचा त्याग त्यांचे परिश्रम महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यात अजून ऊर्जा देतं. शिवरायांनी आम्हाला स्वराज्याची शपथ दिली होती. आता स्वराज्याबरोबरच सुराज्य पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, असं मोदी म्हणाले आहेत..Narendra Modi: बाळासाहेबांची 'ती' इच्छा, पूर्ण कशी झाली सांगताना नरेंद्र मोदींचं 'मविआ'वर टीकास्त्र.नरेंद्र मोदी म्हणाले की, हा संकल्प फक्त भाजप आणि महायुती सरकार करणार. काँग्रेसने फक्त गरिबाला गरीबच बनवून ठेवले आहे. गरिबी हटावचा खोट्या घोषणा देत काँग्रेसने दिवस घालवले. काँग्रेसने गरिबांना लुटलेलं आहे. गरीब या संकटातून बाहेर आला नाही. स्वातंत्र्यांच्या ७० वर्षानंतरही घर कपडे आणि जेवण यासाठी तरसत होते. पहिल्यांदा कुठल्या सरकारने २५ हजार कोटी जनतेला गरिबीच्या खाईतून बाहेर काढले आहे, असं त्यांनी सांगितले. .आम्ही पक्की घर आणि सुरक्षा गरिबांना दिली. शौचालय बांधून देण्याच काम केले. जलजीवन मिशन अंतर्गत १२ करोड जनतेच्या घरात पाणी पोहोचवले. आज सगळ्यांकडे बँक खाते आहे. रेल्वे पटरीवर काम करणारा मजूरही आज युपीएयने पेमेंट करतो. गरीब माणूस स्वतः पुढे जातोय देशाला पुढे नेतोय. या सगळ्या योजनांचा सगळ्यात मोठा लाभार्थी दलित, आदिवासी आणि मागासलेला आहे, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. .ते पुढे म्हणाले की, देशातल्या ८० करोड लोकांना मोफत रेशन पोहोचवले जात आहे. रायगडमध्ये १८ लाख गरीब लोकांना मोफत रेशन मिळत आहे. या कामाला कोणाचा विरोध असू शकतो का ? काँग्रेस पार्टीला याचा आनंद होत नाही. दुःख होतय. अशा लोकांना संधी मिळाली नाही पाहीजे. खुलेआम त्यांचा एक नेता म्हणतोय जे रोहिंग्या आहेत. त्यांना स्वस्तात गॅस देणार आहेत. काँग्रसला थांबवण्याची मोठी जबाबदारी गरिबांवर आहे. २० हजार कोटींनी नवी मुंबई एयरपोर्ट बनत आहे. ८० हजार कोटींनी वाधवान बंदर बनत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.