Cantonment Assembly Election 2024 : विकासकामांमुळेच पुणेकरांची भाजपला साथ मुरलीधर मोहोळ

Cantonment Vidhan Sabha Election 2024 : ‘‘गेल्या पाच वर्षांत भाजपने पुणे शहराचा विकास केला आहे, अनेक वर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लावले आहेत, त्यामुळे पुणेकर भाजपला साथ देणार, यात शंका नाही,’’
Cantonment Vidhan Sabha Election 2024
Cantonment Vidhan Sabha Election 2024esakal
Updated on

पुणे : ‘‘गेल्या पाच वर्षांत भाजपने पुणे शहराचा विकास केला आहे, अनेक वर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लावले आहेत, त्यामुळे पुणेकर भाजपला साथ देणार, यात शंका नाही,’’ असा विश्वास केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

आमदार सुनील कांबळे यांच्या कामाचे कौतुक करत यंदाही कॅंटोन्मेंटमध्ये महायुतीलाच विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघातील भाजप, महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्‍घाटन मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

हेही वाचा

Cantonment Vidhan Sabha Election 2024
Cantonment Assembly Election 2024 : काँग्रेस-भाजपमध्ये होणार थेट लढत

याप्रसंगी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, संजय सोनवणे यांच्यासह सर्व मित्रपक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनील कांबळे म्हणाले, ‘‘विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जात आहे आणि याच मुद्द्यावर नागरिक मला पुन्हा संधी देतील.’’

दरम्यान, कांबळे यांच्या प्रचारार्थ सोमवारी प्रभाग १६ व १७ मधील निवडुंगा विठोबा मंदिर, आझाद आळी येथून विठू माऊलीचे आशीर्वाद घेऊन पदयात्रा काढण्यात आली होती.

यावेळी दक्षिण कन्नडाचे भाजपचे खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा, महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर, विनोद काळोखे, सागर पवार, दिलीप बहिरट, पुरुषोत्तम पिल्ले, मांगीलाल शर्मा आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.