Kasba Assembly Election 2024 : फेरीवाले, पथारीवाल्यांचे प्रश्न सोडविणार रवींद्र धंगेकर

Kasba Vidhan Sabha Election 2024 : ‘‘शहरातील पथारीवाले, हातगाडीवाले आणि स्टॉलधारकांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. त्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवू आणि मागण्यांचा पाठपुरावा करू.
Kasba Vidhan Sabha Election 2024
Kasba Vidhan Sabha Election 2024esakal
Updated on

पुणे : ‘‘शहरातील पथारीवाले, हातगाडीवाले आणि स्टॉलधारकांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे. त्यासंदर्भात विधानसभेत आवाज उठवू आणि मागण्यांचा पाठपुरावा करू. तसेच त्यांच्यासंदर्भातील धोरण अंमलबजावणीचे प्रयत्न करू,’’ अशी ग्वाही कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली.

जाणीव संघटना प्रणीत हातगाडी, फेरीपथारी, स्टॉलधारक संघटनेने धंगेकर यांना पाठिंबा दिला. या संघटनेने गेल्या निवडणुकीतही धंगेकर यांना पाठिंबा दिला होता.

संघटनेतर्फे अध्यक्ष श्वेता ओतारी, उपाध्यक्ष कैलास बोरणे, विभागीय अध्यक्ष विनायक दहिभाते, विभागप्रमुख अभिजित हत्ते, विभागप्रमुख संदीप यादव, विभागप्रमुख परवेझ अन्सारी यांच्या स्वाक्षरीने पाठिंब्याचे पत्र धंगेकर यांना देण्यात आले.

धंगेकर यांनी आज लक्ष्मी रस्ता परिसरातील हातगाडी, फेरीपथारी, स्ट़ॉलधारकांसह व्यापाऱ्यांची भेट घेतली.


दरम्यान, काल धंगेकर यांनी खडकमाळ आळी, सिंहगड गॅरेज, कैकाड आळी,मीरा मार्केट, घोरपडे पेठ, पीएमसी कॉलनी, मोमीनपुरा, देवळाची तालीम, मासे आळी, गंजपेठ, समता भूमी, टिंबर मार्केट, जानाई मळा, आदी भागातून पदयात्रा काढली.

यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, संजय बालगुडे, नरेंद्र व्यवहारे, हेमंत येवलेकर, रमेश साठे, नीलेश बोराटे, पंकज बरिदे इत्यादी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.