Radhanagari Assembly Election 2024 Results : राधानगरी आबिटकरांचीच! अटीतटीच्या लढतीत के. पी. पाटलांचा पराभव

Radhanagari Assembly Election 2024 Results : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आनंदराव आबिटकर यांनी विजय मिळवला होता.
Radhanagari Assembly Election 2024 Results
Radhanagari Assembly Election 2024 Resultsesakal
Updated on

Radhanagari Assembly Election 2024 Results : राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रारंभीपासूनच मताधिक्य घेत शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी बाजी मारली. विरोधक शिवसेना उबाठाचे माजी आमदार के. पी. पाटील यांना दोन - तीन गावं वगळता कुठेही पुढे सरकण्याची त्यांनी संधी दिली नाही. केपींच्या विजयाच्या अनेकांनी लावलेल्या पैजा या विजयापुढे फिक्या ठरल्या. तर, जनतेच्या एकतर्फी निर्णयापुढे आघाडीच्या स्थानिक नेत्यांना मान खाली घालून पराभव स्वीकारावा लागणारा हा निकाल आहे.

आमदार आबिटकर यांची हॅट्रिक रोखण्यासाठी आघाडीच्या सर्वच नेत्यांनी कंबर कसली होती. उद्धव ठाकरे यांनी जंगी सभा घेऊन इथले वातावरण टाइट केले होते. तर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी आपल्या सर्वच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना जणू के. पी. पाटील यांच्या विजयासाठी आदेश दिला होता. यामुळे मतदारसंघात अत्यंत अटीतटीची आणि निकराची लढाई दिसून येत होती. या गदारोळात सामान्य मतदार मात्र शांत होता, उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच त्याने कुणाला मतदान करायचे हा निर्णय ठाम केला होता तो आज मतातून दिसून आला.

राधानगरी तालुक्यातील उमेदवार म्हणून अपक्षाचा झेंडा हाती घेतलेले जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील अपेक्षेपेक्षा खूपच मागे राहिले. राधानगरी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि भुदरगड ही दोन तालुके आणि आजरा तालुक्यातील आजरा महसूल मंडळाचा समावेश होतो. राधानगरी हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.