शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 12वा स्मृतीदिन. देशभरातील नेतेमंडळीनी शिवाजी पार्कवरील समाधीस्थळी त्यांना आदरांजली वाहिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत पोस्ट लिहून आदरांजली व्यक्त केली आहे.