नागपूर: संविधान हे केवळ पुस्तक नसून ते येथील नागरिकांच्या जीवन जगण्याचा मार्ग आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानानुसार काम अपेक्षित नाही. त्यामुळे ते मागून, लपून हल्ला करतात. संविधानावर समोरून हल्ला केल्यास पाच मिनिटांत ते हरतील, अशा शब्दात कॉंग्रेसचे नेते केंद्रातील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज संघ आणि भाजपवर हल्ला चढवला.