Maharashtra Assembly Election 2024: जागावाटपात 'राहुल गांधी' यांची मध्यस्थी, ‘मातोश्री’वर दूरध्वनी; मविआचे सूत्र निश्चित होणार?

Vidhan Sabha Elections 2024: संयुक्त पत्रकार परिषदा आणि मेळाव्यांच्या तारखा ठरवायच्या असताना वादामध्ये गुंतून बसणे योग्य नाही, अशी भूमिका राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितल्याचे समजते.
Rahul Gandhi
Rahul Gandhiesakal
Updated on

मुंबई: भाजपचे राजकीय पतन करायचे असेल तर महाराष्ट्र जिंकायला हवा. सर्व विरोधक एकत्र राहिले तरच ते शक्य असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे समवेत हवेत, अशी भूमिका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतली असून त्यांनी ‘मातोश्री’शी दूरध्वनीवरुन संपर्कही साधला आहे. त्यांच्या सांगाव्यानंतर प्रदेश काँग्रेसने ११० ते ११५ जागांचा आग्रह सोडला असून आता ते १०५, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ९८ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ८५ जागांवर लढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.