माझी दोन दिवसांपूर्वी तब्ब्येत बिघडली. मला बोलता येत नव्हतं. शिवसेना आणि भाजपचे आभार की त्यांनी बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिला. खरं तर हे आभार अनेक ठिकाणी मागता येऊ शकत होते पण जाऊ दे. अत्यंत वाईट स्थिती महाराष्ट्रात आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत आहेत. बाळा नांदगावकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यासाठी लालबागमध्ये सभा आयोजित केली होती.