शर्मिला वाळुंज, डोंबिवली: आमदार फोडाफोडीचे राजकारण होत होत पहिले. आता नुसते फोडाफोडीवर राहिले नाही आता पक्ष, चिन्ह पळवतात. एकनाथ शिंदेनी नाव घेतलं, चिन्ह घेतलं. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांची प्रॉपर्टी नाही ती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रॉपर्टी आहे. असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे व ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच माझे मतभेद असले तरी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे शरदचंद्र पवार यांचे अपत्य आहे असे सांगत राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून राज ठाकरे यांनी समाचार घेतला.