मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नावावर आणि चिन्हावरून एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. "पक्षाचे नाव आणि चिन्ह घेणं योग्य नाही," असं म्हणत त्यांनी शिंदे-पवारांच्या सत्तास्थापनेवर आणि राजकीय संघर्षावर टीकास्त्र सोडलं आहे.
ठाकरे यांनी सांगितलं की, "मी माझ्या पक्षाचे नाव आणि चिन्ह स्वतःच्या मेहनतीने कमावले आहे, ते कोणाकडून घेतलेले नाही."