मुंबई : मुंबईतील वरळी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सभा घेतली. आगामी निवडणुकीत वरळीतून शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होणार असून, मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे लक्षात घेता, राज ठाकरे यांनी ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं आहे. २०१९ साली मनसेने वरळीतून उमेदवार दिला नव्हता; मात्र या वेळी आदित्य ठाकरेंविरोधात देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, ज्यामुळे या मतदारसंघात राजकीय तापमान वाढले आहे.