Ramtek Assembly Election 2024 : मुळक यांच्या उमेदवारीने उद्धव सेना अडचणीत, बंडाचे निशान फडकावलेः रामटेकमधून उमेदवारी दाखल
Ramtek Vidhan sabha Election : राजेंद्र मुळक यांच्या उमेदवारीने उद्धव ठाकरे सेनेची चिंता वाढली आहे. रामटेकमध्ये काँग्रेसने अधिकृत बंड पुकारले असून, राजकीय वातावरण तापले आहे.
नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडाचे निशान फडकावले आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची चिंता वाढली आहे.