डोंबिवली: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना दुसऱ्यांदा पक्षाने निवडणूक रिंगणात उतरवले आहे. गुरुवारी राजू पाटील व अविनाश जाधव या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे यासाठी उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील यांच्यासाठी राज यांनी स्वतः गाडी चालविल्याचे दिसून आले. आमदार पाटील यांच्या गाडीचे स्टेअरिंग राज यांनी हाती घेतले असून या दोन्ही जागांसाठी मनसे जोर लावणार असल्याचे बोलले जात आहे.
मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः हजर होते. विशेष म्हणजे राज यांनी उमेदवार राजू पाटील यांच्या वाहनाचे सारथ्य केल्याचे पहायला मिळाले. रॅलीच्या माध्यमातून मनसेने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले. या रॅलीत 27 गावांसह कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ग्रामस्थ आणि रहिवाशांचा सहभाग लक्षणीय होता.