मुलाखंती देणार्यांमध्ये किरण कुमरे, संजीवनी कासार, प्रा. वसंत पुरके, नाना सिडाम, नरेंद्र पोयाम, अशोक मेश्राम, रमेश कन्नाके, डॉ. अरविंद कुळमेथे, राजू चांदेकर, निनाद सुरपान, रामचंद्र मेश्राम, राजू चांदेकर आदींचा समावेश आहे. त्यापैकी प्रा. वसंत पुरके, संजीवनी कासार, अशोक मेश्राम, डॉ. अरविंद कुळमेथे हे उमेदवार 2 महिन्यांपासून गावोगावी जाऊन मतदारांची मनधरणी करीत आहेत.
अशोक मेश्राम हे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असून काही दिवसांपूर्वी त्यांनी कळंबला पत्रकार परिषद घेतली असता माजी उमेदवाराने वीस वर्षे सत्ता भोगली. परंतु मतदारसंघाचा विकास केला नाही तर आजी आमदार दहा वर्षे झाले सत्ता उपभोगत आहेत. त्यांनीही मतदारसंघाचा विकास न करता स्वतःचा विकास केला आहे.
दोघांनीही मंत्रीपद भोगले पण मतदार संघाचा विकास झाला नाही, असा आरोप करून म्हणून मी निवडणुकीला उभा राहत आहे. मला काँग्रेसच्या वरिष्ठांनी मतदारसंघात जाऊन कामाला लागण्याचे आदेश दिले, म्हणून मला उमेदवारी मिळणार असे ते सांगत होते.