Ramdas Athawale: रामदास आठवलेंना विधानसभेत हव्या आहेत 'इतक्या' जागा!

Chandrapur News: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली.
Ramdas Athawale: रामदास आठवलेंना विधानसभेत हव्या आहेत 'इतक्या' जागा!
Updated on

Latest Political News: राज्यात किमान १० ते १२ जागा आणि विदर्भात तीन जागा रिपाइंसाठी सोडाव्यात अशी आग्रही मागणी महायुतीच्या नेत्यांकडे करण्यात आली आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर विधानसभेची जागा रिपब्लिकन पक्षासाठी सोडावी अशी मागणी महायुतीच्या नेत्यांकडे करण्यात आल्याची माहिती रिपाइं नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Ramdas Athawale: रामदास आठवलेंना विधानसभेत हव्या आहेत 'इतक्या' जागा!
Ramdas Athawale On Jaydeep Apte: "ती चूकच होती..." जयदीप आपटेला शिवरायांच्या पुतळ्याचे काम दिल्याने रामदास आठवलेंचा संताप

गोंडवाना विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सन्मान महोत्सवाचे आयोजन रविवार (ता. २२) करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले शहरात आले. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीतील सर्वच घटक पक्ष कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी चांगले काम केले. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली.

Ramdas Athawale: रामदास आठवलेंना विधानसभेत हव्या आहेत 'इतक्या' जागा!
Ramdas Athawale : ठाकरे-फडणवीस यांच्यातला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी

संविधानाचा सन्मान हा देशाचा सन्मान आहे. संविधानाचा सन्मान करण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. जाती, धर्माच्या नावावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान बदलणारा या देशात जन्माला आलेला नाही.

जाती धर्माच्या नावावर भारतात पाकिस्तान सारखी फाळणी कधीच होणार नाही. आज देशात जातीय व धार्मिक वातावरण दिसत असले तरी समानता मोठ्या प्रमाणात आली आहे. परिस्थिती बरीचशी बदलली आहे. सामाजिक समतेच्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे.

Ramdas Athawale: रामदास आठवलेंना विधानसभेत हव्या आहेत 'इतक्या' जागा!
Ramdas Athawale : ठाकरे-फडणवीस यांच्यातला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी

मराठा समाजाला स्वतंत्र कॅटेगिरीतून आरक्षण द्यावे. मनोज जरांगे ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी करीत आहे. मात्र, ओबीसींमधून आरक्षण न देता यातून मार्ग काढावा, असेही आठवले म्हणाले. २५ ऑक्टोबरपासून राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही समोर जात आहे.

Ramdas Athawale: रामदास आठवलेंना विधानसभेत हव्या आहेत 'इतक्या' जागा!
Ramdas Athawale : विधानसभेत दहा ते बारा जागा मिळाव्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.