Eknath Shinde: विदर्भातल्या 'या' जागेवर केला शिंदे गटाने दावा!

Latest Marathi News: लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयात रामेश्वर पवळ यांनी परिश्रम घेतले आहेत |
Eknath Shinde
Eknath ShindeESakal
Updated on

Latest Maharashtra News: शिवसेना शिंदे गटाचे राज्य समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळणारे रामेश्वर पवळ यांना बाळापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी जिल्हयातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या मागणीवर शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाळापूरची जागा जिल्हयातील राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहावे यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत.

Eknath Shinde
Eknath Shinde VS Ganesh Naik: शिंदेंच्या निर्णयाला नाईकांचा विरोध, महायुतीत वाद पेटणार?

रामेश्वर पवळ यांच्या उमेदवारीसाठी अकोला जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले यांच्यासह अनेक पदाधिकारी व असंख्य शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले. दरम्यान पक्षनिरिक्षक योगेश जानकर (मुंबई) यांच्याकडूनही बाळापूरच्या जागेसंदर्भात महत्वाचे निरिक्षण पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहचविले आहे.

विद्यमान आमदारांना प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून सामाजिक समीकरणातही बसणाऱ्या उमेदवाराची नितांत गरज आहे. तरच ही जागा निघू शकणार आहे. महायुतीत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला आहे.

Eknath Shinde
CM Eknath Shinde : नांदगाव पालिकेच्या इमारतीसाठी 10 कोटींचा निधी देणार : मुख्यमंत्री शिंदे

त्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघातून पवळ यांना उमेदवारी दिल्यास महाराष्ट्रातील वंजारी समाजही शिवसेना पक्षाशी जोडल्या जाईल, अशी अपेक्षा बुंदेले यांनी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयात रामेश्वर पवळ यांनी परिश्रम घेतले आहेत.

Eknath Shinde
CM Eknath Shinde: आता लाडका शेतकरी योजना आणणार! मुख्यमंत्र्यांची परळीत माहिती; म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.