Savner Assembly Elections 2024: विरोधकांना फक्त तीन मतदारसंघाचा विकास हवा का : जि.प. उपाध्यक्ष कुंदा राऊत

Savner Vidhan Sabha Elections 2024: जिल्हा परिषदेच्या सभेत रामटेक, हिंगणा आणि कामठी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना नाहरकत प्रमाणपत्र नाकारले, यावरून विरोधक तांडव करीत आहेत.
Savner Vidhan Sabha Elections 2024
Savner Vidhan Sabha Elections 2024sakal
Updated on

नागपूर: जिल्हा परिषदेच्या सभेत रामटेक, हिंगणा आणि कामठी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांना नाहरकत प्रमाणपत्र नाकारले, यावरून विरोधक तांडव करीत आहेत. त्यांना फक्त स्वतःच्या पक्षाचे आमदार असलेला मतदारसंघाचा विकास हवा आहे का?

इतर मतदारसंघाचा विकास नको आहे का? असा आरोप जि.प. उपाध्यक्षा व बांधकाम सभापती कुंदा राऊत यांनी पत्रपरिषदेत आज केला.

नागपूर जिल्ह्यातील रस्ते, पूल आणि रपटे दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांपासून १०० कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीकडे मागितला आहे. मात्र, अद्यापही तो देण्यात आला नाही. यामुळे रस्ते आणि पुलांची दुरवस्था झाली आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यातील विकासासाठी निधी मिळावा म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले.

३०५४ शिषर्काअंतर्गत विकास निधी मंजूर करण्यात आला. तो फक्त हिंगणा, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी. उमरेड, काटोल आणि सावनेर मतदारसंघातील बांधकामाचे प्रस्ताव पाठविले. मात्र ते मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळेच नाहरकत प्रमाणपत्र नामंजूर करण्यात आल्याचे कुंदा राऊत यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जि.प. अध्यक्ष कुंदा राऊत, सभापती राजकुमार कुसुंबे, सभापती प्रवीण जोध आणि समाजकल्याण सभापती मिलिंद सुटे उपस्थित होते

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.