जालना : मी जखमी शेअर असलो तरी घरात बसणार नाही. आज पक्षाने माझ्यावर राज्यात महायुतीचे सरकार आणण्याची जबाबदारी दिली. अशात कुटुंबातील सदस्यांची पक्षात बंडखोरी नको, म्हणून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. जालना हे व्यापारी आणि उद्योजकांचे शहर आहे. येथे भयमुक्त राहण्यासाठी योग्य माणसाला मतदान करा, असा सल्ला माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला.