Ratnagiri Assembly Election : शिवसेनेची हक्काची मते कोणाला मिळणार? ठाकरे की शिंदे? रत्नागिरीत मोठी चुरस

Ratnagiri Assembly Election : २०१९ च्या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युती असल्यामुळे शिवसेनेतर्फे सामंत चौथ्यांदा निवडून आले.
Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath Shindeesakal
Updated on
Summary

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा रंगतदार सामना होणार आहे. या मतदारसंघांमध्ये शिवसेना-भाजप (BJP) युती असतानाही भाजपचे बाळ माने यांचा तीन निवडणुकांमध्ये पराभव झाला.

पावस : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील (Ratnagiri Assembly Constituency) लढत चुरशीची होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. चारवेळा विजय प्राप्त करणारे उदय सामंत (Uday Samant) हे शिंदे शिवसेनेकडून, तर मागील निवडणुकीत तीनवेळा पराभूत झालेले बाळ माने (Bal Mane) हे ठाकरे शिवसेनेकडून रिंगणात आहेत. पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरीही सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. दोघांनाही शिवसेनेच्या (Shiv Sena) जुन्या मतदारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. रत्नागिरी बालेकिल्ला असल्यामुळे दुभंगलेल्या शिवसेनेची जास्तीत जास्त मते कोण खेचणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.