राज्यात येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. आशात सर्वच पक्ष आणि आघाड्यांनी यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी ईच्छुक उमेदवारही उमेवारीसाठी हालचाली करत आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्यासाठी ईच्छुक उमेदवार, विद्यमान आमदार आणि माजी आमदार पाच वर्षं मतदारसंघात जनतेची कामं करण्यासाठी पळत असतात. पण राज्यात अशीही उदाहरणे आहेत की, ज्यांनी तुरुंगातून निवडणूक लढत ती जिंकण्याचीही कामगिरी केली आहे.
यामध्ये सर्वात अलिकडचे उदाहरण म्हणजे Mahadev Jankar यांच्या पक्षाचे रत्नाकर गुट्टे. रत्नाकर गुट्टे यांनी 2019 मध्ये तुरुंगात असतानाही विधानसभा निवडणुकीत विजयी पताका फडकावली होती.
अवघे आठवीपर्यंत शिक्षण झालेले रत्नाकर गुट्टे सुरुवातीला मजूर म्हणून काम करायचे. हळूहळू त्यांनी प्रगती करत उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आणि साखर कारखाना सुरू केला. दरम्यानच्या काळात त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर हजारो कोटींची कर्जे उचलल्याचे आरोप झाले. आणि पुढे जून 2019 मध्ये त्यांना अटक झाली.
अशात 2019 च्या विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election 2019) जाहीर झाल्या आणि महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षांने त्यांना उमेदवारी दिली.
निवडणुकीच्या रणधुमाळीत गुट्टे तुरुंगात असताना त्यांचे कुटुंबिय आणि कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार करत आघाडी घेतली आणि निकाल जाहीर झाल्यानंतर याचे रुपांतर गुट्टेंच्या विजयात झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान उद्योगपती असलेल्या रत्नाकर गुट्टे यांनी या निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. इतकेच नव्हे तर काहीजण पैसे वाटताना कॅमेऱ्यातही कैद झाले होते. परंतु, पैसे वाटणारे लोक गुट्टे आणि रासपचेच होते हे सिद्ध झाले नाही. त्यामुळे गुट्टेंच्या आमदारकीला कोणतेही आव्हान निर्माण झाले नाही.
15 ऑगस्ट 1963 मध्ये जन्मलेल्या रत्नाकर गुट्टे यांनी बीडच्या सरस्वती शाळेतून आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी शिक्षण सोडल्यानंतर एका कॉन्ट्रॅक्टरकडे मजूर म्हणून काम करायली सुरूवात केली. यानंतर पुढे त्यांनी हळूहळू जम बसवत उद्योग विश्वात पदार्पण केले.
गुट्टेंनी 1998 मध्ये सुनील हायटेक इंजिनियर्स लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली. त्यांचे पुत्र सुनील यांच्या नावावरून कंपनीला सुनील हायटेक असे नाव दिले. सुनील हायटेक ही वीज आणि पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील एक कंपनी आहे.
रत्नाकर गुट्टे यांनी 2009 मध्ये साखर उद्योगात प्रवेश केला आणि गंगाखेड शुगर नावाची कंपनी स्थापन केली. त्यावेळी केंद्रिय कृषी मंत्री असलेल्या Sharad Pawar यांनी गंगाखेड शुगरचे 2 डिसेंबर 2009 मध्ये उद्धाटन केले होते. यानंतर गुट्टे यांनी आरएमजी नावाने आणखी एक साखर कारखाना सुरू केला आहे.
2019 च्या विधानसभेत महायुतीतून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने निवडणूक लढवली होती. त्यावेळी रासपने उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी दिली होती.
जून 2019 मध्ये शेतकऱ्यांच्या नावावर हजारो कोटींची कर्जे उचलल्याच्या आरोपाखाली Ratnakar Gutte यांना अटक करण्यात आली होती. असे असूनही महादेव जानकर यांनी धाडसी निर्णय घेत रत्नाकर गुट्टे यांना संधी दिली अन् गुट्टेने ही निवडणूक जिंकत इतिहास रचला.
या निवडणुकीत गुट्टे यांनी शिवसेनेच्या विशाल विजयकुमार कदम यांचा 18058 मतांनी पराभव करून विजय मिळवला. यात गुट्टे यांना सुमारे 80 हजार मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या कदम यांची गाडी 63 हजारांवरच अडकली.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा परभणी लोकसभा मतदारसंघांत येतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजय (बंडू) जाधव यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा पराभव करून परभणी लोकसभा मतदारसंघात 134061 मतांनी विजय मिळवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.