यवतमाळ : गेल्या पाच वर्षात राज्याने तीन मुख्यमंत्री पाहिले. सत्तेची उलथापालथ होताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची शकले पडली. त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदेंची की, उद्धव ठाकरेंची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की, शरद पवारांचा हा वाद रंगला.