Maharashtra Assembly Election 2024: एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांना 100 पेक्षा अधिक आमदार असणाऱ्या भाजपने पाठिंबा देत मुख्यमंत्री केले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुती म्हणून लढले.
आता राज्यात लागलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुती म्हणून लढत आहेत. पण असे असले तरी महायुतीतील सर्वच पक्षांना त्यांच्याच बंडखोरांचा सामना करावा लागत आहे.
इतकेच नव्हे तर फक्त 40 आमदार असूनही मुख्यमंत्री केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेतेही भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात बंडखोरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.