आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ आज वरळीमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची उपस्थिती होती. वरळीमधील तिरुपती बालाजी मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर सभेला उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणावरही मोठं भाष्य केले आहे.