Ameet Zanak Won Risod Assembly Election 2024 final result: रिसोडमध्ये काँग्रेसचे वर्चस्व कायम, अमित झनक विजयी तर भावना गवळींचा पराभव

Risod Assembly Election 2024 result: रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे. 2009 पासून काँग्रेसने येथे सलग विजय मिळवला आहे.
Risod Assembly Election Result 2024
Risod Assembly Election Result 2024esakal
Updated on

रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत यावेळी मोठी चुरस पाहायला मिळाली. भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीने शिवसेनेच्या विधान परिषद सदस्या भावना गवळी यांना रिंगणात उतरवले, तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित झनक यांनाच पुन्हा संधी दिली. याशिवाय, भाजपाचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रशांत गोळे व भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे विष्णुपंत भुतेकर निवडणुकीत होते.

मात्र अमित झनक यांनी मतदारसंघातील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले. अमित झनक यांचा ६ हजार १३६ मतांनी विजय झाला. त्यांना ७६ हजार ८०९ मते मिळाली. तर भाजपाचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी निवडणूक लढवली. देशमुख यांना ७० हजार ६७३ मते मिळाली. भावना गवळी यांनी तीन नंबरची मते घेतली. गवळी यांचा १६ हजार ११६ मतांनी पराभव झाला. त्यांना ६० हजार ६९३ मते मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.