आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता राज्यात लागू झाली आहे. अशात पुण्याजवळील खेडशिवापूर टोल नाका येथील निवडणूक आयोगाच्या चेक पोस्टच्या तपासणीत एका गाडीतून पाच कोटी रुपये मिळाल्याचं समोर आला आहे. ही गाडी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या कार्यकर्त्याची असल्याची चर्चा सध्या सर्वत सुरू आहे.ॉ
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेवर सोशल मीडिया पोस्ट करत आणखी चार गाड्या कुठे गेल्या असा सवाल उपस्थित केला आहे.
शिवापूर टोलनाका येथील चेक पोस्ट मध्ये अशा प्रकारचे पैसे आढळून आल्यानंतर राज्य सरकारवर सडकून टीका करत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारावर गंभीर आरोप केला आहे. हा ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं! असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.