:उपमुख्यमंत्री अजित पवार इतकी वर्षे झोपले होते का? त्यांना हे आता आठवले का?, २०१९ च्या निवडणुकीत का नाही आठवले?, असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले. मंत्रिमंडळात येण्यापूर्वी त्यांचे तोंड बंद करून ठेवले होते, का असा टोलाही त्यांनी लगावला.
सिंचन गैरव्यवहाराच्या कागदपत्रांवर दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची स्वाक्षरी होती. त्यांनी माझा केसाने गळा कापला, असे वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांचा समाचार आव्हाड यांनी घेतला. नाशिक पूर्व मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आव्हाड आले होते.
‘‘