जालना : विधानसभा निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी काही उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा, असे प्रतिपादन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केले. जालना विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचारार्थ गांधी चमन येथे सायंकाळी जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.