मुंबई : माहिम-दादर विधानसभा मतदारसंघातील अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्या उमेदवारीवरुन सध्या बरीच राजकीय गरमागरमी पाहायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी नाराजी व्यक्त केली असून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.