विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरड राजकारण देखील पाहायला मिळत आहे. निवडणुकीत जिंकून येण्यासाठी विकास कामे, भविष्यात काय काम करणार आहात हे सांगायचं असते. मात्र राजकारणी एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. काल सदाभाऊ खोत यांनी तर सीमारेषा पार केली. राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. सदाभाऊ यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण शेवटी राजकीय असले म्हणून काय झालं? माणूसपण देखील महत्त्वाचं आहे. सदाभाऊ खोत यांचं हे पहीलचं वादग्रस्त विधान नाही यापूर्वी देखील त्यांनी आपल्या भाषणातून असे विधान केले आहेत.