कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांमधील अनेक नाराजांनी आक्रमक पवित्रा घेत, बंडखोरी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळं खरंतर मोठा पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. परंतू अद्याप उमेदवारी अर्ज मागे घेण्यास मुदत असल्यानं या बंडखोर उमेदवारांना शांत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार आता भाजपमधील बंडखोरी केलेल्या सम्राट महाडिक यांना थंड करण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आलं आहे.