Ganesh Naik : संदीप नाईक तुतारी फुंकणार? उमेदवारी जाहीर होऊनही गणेश नाईकांची नाराजी

Maharashtra Assembly elections 2024: संदीप नाईक यांना बेलापूर मतदारसंघातून उमेदवारीची अपेक्षा होती. परंतु भाजपने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले संदीप नाईक हे तुतारी फुंकणार असल्याची माहिती आहे. संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बेलापूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात.
Ganesh Naik : संदीप नाईक तुतारी फुंकणार? उमेदवारी जाहीर होऊनही गणेश नाईकांची नाराजी
Updated on

Sandeep Naik: भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये गणेश नाईक यांना एरोली मतदारसंघातून उमेदवारी दिली असून मंदा म्हात्रे यांना बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु गणेश नाईक हे त्यांच्या सुपुत्रासाठी उमेदवारी मागत होते, ही मागणी मात्र भाजपने फेटाळली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.