संगमनेर : धांदरफळ येथील घटना दुर्दैवी असून, महिलांचा अपमान होत असताना जनतेसमोर तुम्ही टाळ्या वाजवल्या. या घटनेला तुम्ही जबाबदार आहे. मागील अडीच वर्षांत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करून त्रास दिला. तालुक्याला त्रास देणाऱ्यांना माफी नाही, असे सांगताना दहशतवादी प्रवृत्ती रोखण्यासाठी उमेदवार कोण? हे न पाहता त्याच्या मागची प्रवृत्ती पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा, असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.