Sangli Election : सांगलीत जयश्री पाटील यांची बंडखोरी; खासदार विशाल पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष, मिरजेत बंड टळले

Sangli Assembly Constituency Election : चार दिवसांपासून जयश्री पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
Sangli Assembly Elections Jayshree Madan Patil
Sangli Assembly Elections Jayshree Madan Patilesakal
Updated on
Summary

श्रीमती जयश्री पाटील यांच्या बंडानंतर खासदार विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात (Sangli Assembly Constituency) श्रीमती जयश्री मदन पाटील (Jayshree Madan Patil) यांचे बंड टाळण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले. ‘मी बंडखोरी करणार,’ हा शब्द त्यांनी खरा करून दाखवत काँग्रेस उमेदवारासमोर आव्हान उभे केले आहे. जिल्ह्यात सांगलीसह जत, खानापूर मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. सांगलीतून शिवाजी डोंगरे, तर शिराळ्यातून सम्राट महाडिक यांनी उमेदवारी मागे घेतल्याने भाजपने निःश्वास टाकला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.