पाटण तालुक्यात देसाई व पाटणकर यांचा परंपरागत राजकीय संघर्ष आहे. तेथे दोन्ही घराणी मातब्बर असून दुसऱ्या पिढीतही तो तीव्र होत आहे.
सांगली : सत्ता हे सेवेचे साधन मानणाऱ्या राजकारण्यांचे गणगोत हा नेहमी चर्चेचा विषय असतो. पक्ष कोणताही असो; सत्ता, खुर्ची, पदे महत्त्वाची हे सूत्र मानून ‘सर्वपक्षीय’ राजकारणी कार्यरत असल्याचे दिसून येते. वडील, मुलगा, मुलगी, भाऊ, सून, मेहुणे-पाहुणे, साडूभाऊ असे नात्यागोत्यांचे राजकारण पूर्वीपासूनच आहे.