''लोकसभेला गोंधळ झाला, पुन्हा विधानसभेला तेच. माझ्याकडं जादूची कांडी आहे का, एका विधानसभेतून दोन उमेदवार द्यायला?''
सांगली : ‘‘जयश्रीताई (Jayshree Patil) सरळमार्गी, भोळ्या आहेत. त्यांना बंडखोरी करण्यासाठी फितवलं गेलंय. कुणी फितवलं याचं सत्य बाहेर येईल, तेव्हा त्याची खैर नाही, हे लक्षात ठेवावं,’’ असा इशारा देत आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांनी सांगलीतील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) यांच्या प्रचाराचा नारळ फोडला.