देशात-राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पाठिंबा देतात आणि सांगलीत भाजपला फायदा करण्यासाठी उभ्या असलेल्या अपक्षाला पाठिंबा देतात, हे धक्कादायक आहे.
सांगली : ‘‘लोकसभेला विशाल पाटील तुमची कोंडी झाली, तेव्हा दलित समाज पाठीशी ठाम उभा राहिला. तुम्ही भाजपच्या (BJP) विरोधात लढताय, म्हणून ताकदीनं मतदान केलं, निवडून आणलं. आता तुम्ही भाजपला मदत होईल, असं वागताय. एवढ्या लवकर बदलाल, असं वाटलं नव्हतं. तुम्ही चुकताय. अपक्षाला साथ देणं म्हणजे भाजपला मदत करणं,’’ अशी टीका दलित चळवळीचे नेते प्रा. सुकुमार कांबळे (Prof. Sukumar Kamble) यांनी येथे केली.