महाविकास आघाडीचा ९०-९०-९०चा फॉर्म्युला तयार करण्यात आला असून त्या जागा वाटपात मिरजेचा तिढा सुटेल, असे सांगण्यात आले.
सांगली : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मिरज मतदारसंघावरून (Miraj Constituency) वाद पेटला आहे. हा मतदारसंघ आपल्याच वाट्याला येणार, असे गृहीत धरून तयारी केलेल्या काँग्रेसची शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने कोंडी केली आहे. ‘मिरज आम्हालाच हवे,’ अशी दोन्ही पक्षांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांना दिल्लीपर्यंत धडक द्यावी लागली आहे.