सध्या काँग्रेसकडे पलूस-कडेगाव, जत आणि सांगली या तीन जागा आहेत. राष्ट्रवादीकडे शिराळा, इस्लामपूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ या तीन जागा होत्या. खानापूर आणि मिरज या दोन जागा चर्चेला खुल्या होत्या.
सांगली : जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भारी ठरला आहे. त्यांना आठपैकी चार जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या तीन जागा कायम आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेसला नडली असून, त्यांनी २००४ नंतर ‘मिरज काबीज’ केले आहे. आता जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीत नंबर एक होण्याची स्पर्धा पाहायला मिळेल. त्यात कोण बाजी मारेल की त्यांचा वारू रोखून भाजप नंबर वन होईल, याकडे लक्ष असेल.