‘‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ ‘बटेंगे तो कटंगे’ म्हणतात. आमची भूमिका ‘पढेंगे तो बढेंगे’ आहे.’’
इस्लामपूर : ‘‘घड्याळवाले (NCP) कसे आहेत ते चांगलेच माहीत आहे. मी बोलायला लागलो तर त्यांचा ‘कार्यक्रमच’ होईल,’’ असे म्हणत ‘‘कार्यकर्त्यांना कोणी धमकावले, दम दिला, केसाला धक्का लावाल तर याद राखा, मी कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे,’’ असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गांधी चौकात आयोजित प्रचार सभेत दिला.