पाच वर्षे जिरवाजिरवीचे राजकारण केल्यानंतर पुन्हा औदुंबरच्या वटवृक्षाच्या छायेत जनसमुदायासमोर आपापसातले वाद औदुंबरच्या डोहात बुडवल्याच्या आणाभाका घेत इथे सभा व्हायच्या.
Sangli Assembly Election : सांगली जिल्हा पूर्वी दक्षिण सातारा म्हणून ओळखला जायचा. सांगली जिल्हा झाला आणि इथले राजकारणही स्वतंत्रपणे फुलू लागले. १९६० पासूनच्या प्रत्येक निवडणुकीचे आणि सध्याच्या पलूस तालुक्यातील औदुंबरचं खास असं वेगळं नातं आहे. कृष्णा नदीच्या (Krishna River) धीरगंभीर अशा डोहात राजकारणांच्या अनेक लाटा सामावल्या आहेत. इथल्या डोहाच्या साक्षीनेच यशवंतराव-वसंतदादा ते पतंगराव-आरआर-जयंतरावांच्या पिढीपर्यंतच्या राजकारण्यांनी आपल्या जाहीर सभा गाजवल्या.