सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणूक रिंगणात उमेदवार होते. ९९ पैकी सोळा प्रमुख उमेदवार वगळता अन्य तेरा जणांनाच चारअंकी मतदान घेण्यात यश आले.
सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील (Sangli Assembly Election Results) तब्बल ८३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यात ‘सांगली’तून जयश्री पाटील, ‘आटपाडी’तून माजी आमदार राजेंद्र देशमुख, ‘जत’मधून भाजपचे (BJP) बंडखोर तम्मनगौडा रविपाटील या तीन मातब्बरांचा त्यात समावेश आहे. सोळा उमेदवार लढले, बाकीचे नडले, असेच चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांव्यतिरिक्त सर्वाधिक मतदान श्रीमती पाटील यांना मिळाले. त्यांनी ३२ हजारांवर मते घेतली.